Home » Tourism » पर्यटनाचा विकास कशासाठी आणि कोणासाठी ?

पर्यटनाचा विकास कशासाठी आणि कोणासाठी ?

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 91 other followers

Categories

Twitter Psot

Error: Twitter did not respond. Please wait a few minutes and refresh this page.

Advertisements

पर्यटनाच्या विकासाठी ऐतिहासिक शहर औरंगाबाद येथे पर्यटन मंत्रालय केंद्र आणि राज्य सरकार , पर्यटन महामंडळ राष्ट्र स्तरीय परिषदेचे आयोजन होत आहे. वेगवगळ्या विषयावर , प्रश्नावर चर्चा करणार आहेत त्या निमित्ताने माननीय पर्यटन मंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकर, माननीय पर्यटन मंत्री महाराष्ट्र सरकार, भारत पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. 

आपण पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून बरेच प्रयत्न केले किंबहुना करत आहात  केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात खाजगी आणि परदेशी गुंतवणूक होत आहे विदेशी चलन ही मोठ्या प्रमाणात मिळत आहे . तस म्हणतल तर पर्यटनाचा विकास झापाट्याने होत आहे  पण यांना साधा आणि सरळ प्रश्न प्रश्न आम्हाला विचारावा वाटतो की

 पर्यटनाचा विकास कशासाठी आणि कोणासाठी ?

 जगभरच्या तुलनेत भारत संस्कृती प्रधान विविध पंरपरेने नटलेला देश जागतिक वारसा असलेली प्रेक्षणीय स्थळे त्याचबरोबर येथील संस्कृतीच आकर्षण सगळ्यांना आहे आणि महाराष्ट्र राज्य म्हंटल तर पर्यटनाच्या बाबतीत कुठेच मागे नाही. वाळवंट सोडले कि पर्यटनाचे सर्व प्रकार, सर्व ठिकाण किल्यान पासुन ते गिरस्थान व राजवाड्या पासून ते लेण्या पर्यन्त सर्वकाही पर्यटकासाठी इथे उपलब्ध आहे म्हणून तर आपण म्हणतो “अनलिमीटेड महाराष्ट्र”!

 इतकी सगळी पर्यटन स्थळे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, हाय  टेक टेक्नोलॉजी,  हे सर्व आसताना इतर देशाच्या तुलनेत किती हो विकास झाला.  मागील काही वर्षाची आकडेवारी पाहता किती विदेशी पर्यटक आले आणि भारतातून किती पर्यटक विदेशात गेले , येणाऱ्यान पेक्षा येथून जाणाऱ्या ची संख्या जास्त, विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवात किती विदेशी पर्यटक हजेरी लावतात. कोट्यवधी निधी मिळूनही किती सुविधा पर्यटकांना उपलब्ध आहेत , जागतिक वारसा असलेल्या ठिकाणच्या भूमिपुत्रांची आज काय आवस्था आहे.

 मग पर्यटनाचा विकास झाला कुठे ? आणि त्याची कारण काय ?

राजकीय दृष्टिकोनातून उत्तर द्याल तर अतेरेकी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, गरिबी, निधीचा आभाव असेच उत्तर येईल पण एक अभ्यासक , समीक्षक म्हणून उत्तर द्याल तर उत्तर नक्कीच वेगळ अपेक्षित करतो आम्ही.

 तुम्हाला खऱ्या अर्थाने पर्यटनाचा विकास करायचा आसेल तर त्याला पाहिजे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशिक्षित  म्हणजे निवड झाल्यावर एक महिन्याच प्रशिक्षण नव्हे. त्याच शिक्षण, त्याच्या कामाचा अनुभव , त्याच संशोधन आणि त्याचा आभ्यास पर्यटनावर आसेल तोच पर्यटनाचा योग्य पद्धतीने विकास करू शकतो.  प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, तद्न्य व योग्य मनुष्यबळ असणे ही त्या कामाची गरज आसते तरच विकास करता येईल.  सोप उदाहरण आहे साहेब एखाद्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर ची निवड करण्यासाठी शैक्षणिक पात्रता एम.बी.बी.एस. च द्यावी लागेल कि कुठल्याही शाखेचा पदवीधर त्याच बरोबर माहिती  आणि तंत्रज्ञान यासाठी आय. टी. च पात्रता आवश्यक आहे.

मग पर्यटनाच्या बाबतीत अस का ? पर्यटन महामंडळच्या सर्व पदाच्या जाहिराती चाळून बघितल्या तर कुठल्याही शाखेचा पदवीधर पात्र आहे. त्या पदाकरिता पर्यटन शिक्षण आणि अनुभव का अनिवार्य नाही. 

 पर्यटन मंत्रालय भारत सरकारने पर्यटनाचे महत्व समजून पर्यटनाचे अभ्यासक्रम सुरु केले जेणे करून प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल आणि पर्यटन विकास कर ता येईल. आय.आय.टी. टी. एम. च्या माध्यमातून भारतातील पाच केंद्रावर पर्यटनाचे पद्युतर शिक्षण सुरु केले. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे त्यापैकी एक केंद्र आहे. या पर्यटन प्रशासन विभागात दोन वर्षाचा पद्युतर पर्यटनाचा आभ्यासक्रम सुरु आहे या अभ्यासक्रमात विद्यार्थी वेगवेगळ्या ३२  पर्यटन विषयाचा आभ्यास करतात, येथील विद्यार्थी संशोधन करता आहेत. पर्यटनासाठी मनुष्यबळ येथे तयार होत  आहे. आज हे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे कुठे, खाजगी कंपन्या मध्ये त्यांच्या कौशल्याचा वापर करून कंपनी मोठा नफा कमवत आहेत. 

 दुसरीकडे ज्याला पर्यटनाच ‘प’ माहित नाही आश्या व्यक्ती पर्यटनाच विकास करता आहेत, नुकतीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी वरीष्ठ व्यवस्थापक , व्यवस्थापक, आणि अधिकारी पदासाठी जाहिरात दिली होती आणि पत्रेतेमध्ये पर्यटन शिक्षणला विशेष पसंती देण्यात येईल असे नमूद केले होते.

 अशी जाहिरात बघून आनंद झाला आणि आम्ही त्याचे स्वागत ही केले  पण त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर माहितीच्या अधिकारा खाली  आम्ही काही माहिती मिळवली तर हा दुटपी पणा वाटला कारण निवड झालेल्या उमेदवारामध्ये कोणाचे ही शिक्षण पर्यटनाचे नव्हते किंबहुना पर्यटनाच्या कामाचा अनुभव नव्हता. निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता या प्रकारे होती. शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी . (एग्री ), बी.ए., बी.ई , बी.कॉम . कामाचा अनुभव : बँक, जिल्हा परिषद , कोचिंग क्लासेस , पंचायत समिती , मशिनरी इन्चार्ज ऑटोमोबाईल.

 आशा प्रकारे निवड झाली तर कसा होणार पर्यटनाचा विकास. केवळ जाहिराती मध्ये पर्यटन विषयाला पसंती देऊ असे लिहून चालणार नाही, हा तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला. तर आमची मागणी आहे कि यापुढे प्रत्येक जाहिराती मध्ये पर्यटन विषय अनिवार्य करा. तरच आपले अत्युल्य भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

 आपला विश्वासू

 अनिल पुनमचंद बनकर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: